Varsha Balhe
४५०० वर्षांपूर्वी बांधलेले इजिप्तचे पिरॅमिड आजही जगाला आश्चर्यचकित करतात. हे पिरॅमिड कोणी बांधले, का बांधले आणि त्यांच्या आत नक्की काय आहे?
EGYPT PYRAMIDS MYSTERY WHO BUILT THE PYRAMIDS
esakal
पिरॅमिड एलियन्सनी बांधले, असं म्हणणारे अनेक किस्से आहेत. पण पुरातत्त्वीय पुरावे काही वेगळंच सांगतात. हे काम इजिप्तमधील कुशल कामगार आणि मजुरांनी केलं होतं.
EGYPT PYRAMIDS MYSTERY WHO BUILT THE PYRAMIDS
esakal
गिझाचा सर्वात मोठा पिरॅमिड फॅरो खुफूसाठी बांधण्यात आला होता. हा पिरॅमिड बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार आणि अनेक वर्षांचा वेळ लागला.
EGYPT PYRAMIDS MYSTERY WHO BUILT THE PYRAMIDS
esakal
पिरॅमिड हे फॅरोचे भव्य थडगे होते. प्राचीन इजिप्तमध्ये मृत्यूनंतरही जीवन असतं, असा विश्वास होता. त्यामुळे फॅरोचं शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी ममी बनवली जात असे.
EGYPT PYRAMIDS MYSTERY WHO BUILT THE PYRAMIDS
esakal
पिरॅमिडच्या आत गेल्यावर अरुंद मार्ग, मोठ्या खोल्या आणि भव्य दगडी रचना दिसतात.
यात किंग्स चेंबर, क्वीन्स चेंबर आणि ग्रँड गॅलरी यांचा समावेश आहे.
EGYPT PYRAMIDS MYSTERY WHO BUILT THE PYRAMIDS
esakal
किंग्स चेंबरमध्ये ग्रॅनाइटची एक मोठी दगडी शवपेटी आहे. पण त्यात खुफूची ममी आज सापडत नाही. पिरॅमिडमधील मौल्यवान वस्तू प्राचीन काळातच लुटल्या गेल्या असण्याची शक्यता आहे.
EGYPT PYRAMIDS MYSTERY WHO BUILT THE PYRAMIDS
esakal
इथंच पिरॅमिडचं रहस्य आणखी वाढतं. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शास्त्रज्ञांना ग्रँड गॅलरीच्या वर एक मोठी पोकळी आढळली. तिची लांबी किमान ३० मीटर असल्याचं संशोधनात दिसून आलं.
EGYPT PYRAMIDS MYSTERY WHO BUILT THE PYRAMIDS
esakal
ही पोकळी नेमकी कशासाठी बनवली होती, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
म्हणूनच ४५०० वर्षांनंतरही गिझाचा ग्रेट पिरॅमिड आपल्या काही गोष्टी अजूनही लपवून ठेवून आहे.
EGYPT PYRAMIDS MYSTERY WHO BUILT THE PYRAMIDS
esakal
MUGHAL EMPIRE DECLINE FROM AURANGZEB TO 1857
esakal