Sesame Oil Benefits : दररोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा तिळाचे तेल प्या आणि अनुभवा 'हे' 6 जबरदस्त बदल

बाळकृष्ण मधाळे

तिळाच्या तेलाचे फायदे

तिळाचे तेल केवळ स्वयंपाकासाठीच उपयोगी नाही, तर ते प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. आयुर्वेदानुसार, हे तेल अतिशय फायदेशीर मानले गेले आहे.

Sesame Oil Benefits

हृदयाचे आरोग्य सुधारते

तिळाच्या तेलात असलेले हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो.

Sesame Oil Benefits

शरीरातील सूज कमी करते

तिळाच्या तेलात नैसर्गिक अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे सांधेदुखी, सूज आणि स्नायूंची जडत्वता कमी होण्यास मदत होते.

Sesame Oil Benefits

पचनासाठी फायदेशीर

तिळाचे तेल पिल्याने आतड्यांना वंगण मिळते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. हे पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि अपचनाच्या त्रासापासून सूट देते.

Sesame Oil Benefits

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

तिळाचे तेल नियमितपणे प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. विशेषतः ऋतू बदलताना होणाऱ्या संसर्गांपासून संरक्षण मिळते.

Sesame Oil Benefits

हाडे मजबूत करते

तिळाच्या तेलात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे मिनरल्स असतात, जे हाडे बळकट करण्यासाठी उपयुक्त आहेत. विशेषतः ज्येष्ठांसाठी हे तेल खूप फायदेशीर ठरते.

Sesame Oil Benefits

त्वचा हायड्रेटेड राहते

हे तेल शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेवर तेज येतो. त्वचा हायड्रेटेड राहते आणि तरुण दिसते.

Sesame Oil Benefits

केव्हा आणि कसे प्यावे?

दररोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा तिळाचे तेल पिणे फायदेशीर ठरते. त्यानंतर कोमट पाणी प्यावे. हे शरीरासाठी अधिक उपयुक्त मानले जाते.

Sesame Oil Benefits

सूचना :

तिळाचे तेल सर्वांसाठी फायदेशीर असले तरी, कोणाला अ‍ॅलर्जी अथवा आरोग्याच्या समस्या असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Sesame Oil Benefits

Persistent Headache Remedies : डोकेदुखी थांबत नसेल तर काय करावे?

Persistent Headache Remedies | esakal
येथे क्लिक करा