मधुमेह आणि त्वचेसाठी लाभदायी आहे मटार; जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Monika Lonkar –Kumbhar

वाटाणा

हिरवागार वाटाणा खायला कुणाला आवडत नाही, हिरव्या वाटाण्याला ‘मटार’ असे ही म्हटले जाते. 

Green Peas Health Benefits

खाद्यपदार्थ

पावभाजी, मटार पनीर, वाटाण्याची भाजी, मटार करंजी इत्यादी अनेक प्रकार या मटारपासून बनवले जातात. हे सर्व खाद्यपदार्थ आपण आवडीने खातो.

Green Peas Health Benefits

आरोग्यदायी फायदे

मटारमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि प्रोटिन्स असतात. ज्यामुळे, आपल्या शरीराला छान ऊर्जा मिळते. मटारमध्ये असणारे क्यूमेस्ट्रॉल हे पोषक तत्व कॅन्सर विरोधात लढण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मटारचे इतर फायदे आपण जाणून घेऊयात.

Green Peas Health Benefits

मधुमेहासाठी लाभदायी

मटारमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे घटक देखील मटारमध्ये आढळून येतात. त्यामुळे, मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहारात वाटाण्याचा समावेश करावा.

Green Peas Health Benefits

रोगप्रतिकारक क्षमता वाढते

मटारमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशिअम आढळते. ज्यामुळे, आपल्या शरिराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत मिळू शकते. 

Green Peas Health Benefits

त्वचेसाठी फायदेशीर

मटारमध्ये त्वचेसाठी अनुकूल असणारे पोषक घटक असतात. या सर्व पोषक घटकांमुळे त्वचेतील कोरडेपणा, काळे डाग, निस्तेज त्वचा इत्यादी समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Green Peas Health Benefits

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते

एका संशोधनानुसार मटारमध्ये अ‍ॅंटी कोलेस्ट्रॉल गुण आढळून आले आहेत. त्यामुळे, मटारचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. 

Green Peas Health Benefits

फ्लोरल ब्लेझर सूटमध्ये श्रद्धाचा 'सो ब्युटीफूल' अंदाज

Shraddha Kapoor | esakal