Aarti Badade
लाल आणि हिरव्या सफरचंदांमध्ये काय फरक आहे हे जाणून घेणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
लाल सफरचंद गोड, रसाळ आणि पातळ सालेचे असते, तसेच त्यामध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
हिरवे सफरचंद आंबट, कुरकुरीत आणि जाड सालेचे असते, ज्यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन A अधिक असते.
हिरव्या सफरचंदात साखरेचे प्रमाण कमी असते, त्यामुळे मधुमेहींसाठी ते जास्त फायदेशीर मानले जाते.
लाल सफरचंद अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे पचनक्रिया आणि आतड्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
दोन्ही प्रकारच्या सफरचंदांमध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असून ते आरोग्य सुधारण्यात मदत करतात.
तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार लाल किंवा हिरवे सफरचंद निवडून दररोज एक सफरचंद खाणे ही चांगली सवय आहे.