केस पांढरे कशामुळे होतात? काय काळजी घ्यावी?

सकाळ डिजिटल टीम

केस पांढरे का होतात?

केस पांढरे होणे ही अत्यंत सामान्य समस्या आहे. केसांचा रंग मेलानिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. शरीरात मेलानिनची निर्मिती कमी होते तेव्हा केस पांढरे किंवा राखाडी दिसू लागतात.

Gray Hair

|

Esakal

आनुवंशिकता

कुटुंबात किंवा आई-वडिलांचे केस कमी वयात पांढरे झाले असतील तर तुमचेही केस कमी वयात पांढरे होण्याची शक्यता जास्त असते.

Gray Hair

|

Esakal

पोषक तत्वांची कमतरता

आहारातून शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे न मिळाल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. विशेषतः व्हिटॅमिन B12, लोह, तांबे आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस वेळेआधी पांढरे होतात.

Gray Hair

|

Esakal

मानसिक ताण

सततचा मानसिक ताण आणि अपुरी झोप यामुळे शरीरातील पेशींवर ताण येतो. ताणतणावामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. सोबतच मेलानिन बनवणाऱ्या पेशींचेही नुकसान झाल्याने केस पांढरे होतात.

Gray Hair

|

Esakal

जीवनशैली

धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि केसांच्या मुळांपर्यंत रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत नाही. तसंच जास्त प्रमाणात हेअर डाय, ब्लीच आणि सल्फेटयुक्त शाम्पू वापरल्याने केसांमधील नैसर्गिक रंगद्रव्ये नष्ट होतात.

Gray Hair

|

Esakal

काय काळजी घ्यावी?

आहारात हिरव्या पालेभाज्या, अंडी, दूध, सुकामेवा (बदाम, अक्रोड), कडधान्ये आणि मोड आलेले धान्य यांचा समावेश करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन B12 आणि आयर्नचे प्रमाण तपासून घ्या.

Gray Hair

|

Esakal

इतर उपाय

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. आवळा ज्यूस पिणे किंवा आवळा तेल यामुळे केसांना नैसर्गिक पोषण मिळते.

Gray Hair

|

Esakal

ताणतणाव व्यवस्थापन

दररोज किमान ७ ते ८ तासांची शांत झोप घ्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासने, ध्यान आणि प्राणायाम नियमित करा. केसांना कडक उन्हापासून आणि रासायनिक हेअर ट्रीटमेंटपासून वाचवा.

Gray Hair

|

Esakal

एकावेळी दोन पायऱ्या चढल्यानं खरंच शरीराला फायदा होतो का?

benefits of 

|

eSakal

इथं क्लिक करा