Aarti Badade
आजकाल लहान मुलांचेही केस पांढरे होत आहेत. खराब जीवनशैली, आहार, पोषणाचा अभाव, ताणतणाव आणि हार्मोनल समस्या ही केस पांढरे होण्याची मुख्य कारणे आहेत.
केस काळे करण्यासाठी अनेक उपाय असले तरी, नारळाचे तेल हा एक प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग आहे. पोषक तत्वांनी समृद्ध नारळाचे तेल पांढऱ्या केसांची समस्या दूर करू शकते.
आवळा हा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतो, जो केस अकाली पांढरे होण्यापासून रोखतो.
२-३ चमचे नारळाच्या तेलात १-२ चमचे आवळा पावडर किंवा रस घालून शिजवा. रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण केसांना लावा.
मेथीचे दाणे फायबर, प्रथिने आणि निकोटिनिक ऍसिडने समृद्ध असतात. ते केस गळती रोखण्यास आणि केस मुळांपासून काळे करण्यास मदत करतात.
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी बारीक करा. या पेस्टमध्ये थोडे खोबरेल तेल घालून गरम करा. १-२ तास लावल्यानंतर केस धुवा.
नारळाच्या तेलात आवळा किंवा मेथी मिसळून वापरल्यास तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल. हे उपाय केसांना पोषण देऊन त्यांना मजबूत बनवतात.