केस होतील लांब! एकदा करा 'हा' जुना आयुर्वेदिक उपाय

Aarti Badade

केसांसाठी प्राचीन आयुर्वेदिक वारसा

केस गळणे आणि विरळ होण्याच्या समस्येवर आयुर्वेदात एक विस्मयकारक उपाय सांगितला आहे, तो म्हणजे 'सांब्राणी धुपाची धुरी'. पूर्वीच्या काळी पद्धत अत्यंत लोकप्रिय होती.

Sambrani dhoop for hair growth

|

Sakal

काय आहे सांब्राणी धूप?

सांब्राणी धूप हा 'स्टायरॅक्स' वृक्षापासून मिळणारा एक नैसर्गिक डिंक आहे. याचा सुगंध कस्तुरीसारखा असून तो केवळ केसांसाठीच नाही, तर मनःशांती आणि तणावमुक्तीसाठीही ओळखला जातो.

Sambrani dhoop for hair growth

|

Sakal

टाळूचे आरोग्य आणि स्वच्छता

सांब्राणीच्या धुरात कडुलिंब आणि तुळस मिसळल्यास त्यात अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म येतात. यामुळे टाळूवरील बॅक्टेरिया, घाण आणि कोंडा साफ होण्यास मदत होते, ज्यामुळे केसांची मुळे निरोगी राहतात.

Sambrani dhoop for hair growth

|

Sakal

रक्ताभिसरण आणि वाढ

केसांना धुरी दिल्याने डोक्याच्या भागातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळते आणि केसांची लांबी नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होते.

Sambrani dhoop for hair growth

|

Sakal

वापराची योग्य पद्धत

आंघोळीनंतर ओल्या केसांवर ही धुरी घ्यावी. धुपपात्र आणि केस यामध्ये किमान १५ ते २५ सेंटीमीटर अंतर ठेवावे. धुरी घेऊन झाल्यावर जाड दातांच्या फणीने केस विंचरल्यास धुपातील नैसर्गिक तेल केसांत व्यवस्थित पसरते.

Sambrani dhoop for hair growth

|

Sakal

सावधानता आणि तज्ज्ञांचा सल्ला

सांब्राणीचा वापर दररोज करू नये; महिन्यातून केवळ १ ते २ वेळाच ही पद्धत अवलंबावी. धूर घेताना जागा हवेशीर असावी, जेणेकरून फुफ्फुसांवर ताण येणार नाही.

Sambrani dhoop for hair growth

|

Sakal

नकारात्मक ऊर्जा होईल नष्ट

प्राचीन मान्यतेनुसार, सांब्राणीच्या धुपाने केवळ केसांचे आरोग्यच सुधारत नाही, तर घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि वातावरणात प्रसन्नता येते.

Sambrani dhoop for hair growth

|

Sakal

सततची अ‍ॅसिडिटी किती धोकादायक असू शकते?

Acidity side effects

|

Sakal

येथे क्लिक करा