Varsha Balhe
तुम्ही पेरू हे फळ वेगवेगळ्या प्रकारे खाल्लं असेल. पेरूची फ्रूट चाट किंवा ज्यूसही प्यायला असेल. पण तुम्ही कधी पेरूची चटणी खाल्ली आहे का?
EASY GUAVA CHUTNEY RECIPE IN 10 MINUTES
esakal
आज आपण पेरूची चटणी बनवण्याची सोपी आणि १० मिनिटांत तयार होणारी रेसिपी जाणून घेणार आहोत.
EASY GUAVA CHUTNEY RECIPE IN 10 MINUTES
esakal
१ मोठा पेरू, १ हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, आलं, १ चमचा जिरे, लिंबाचा रस, चाट मसाला, साखर आणि मीठ चवीनुसार.
EASY GUAVA CHUTNEY RECIPE IN 10 MINUTES
esakal
सर्वात आधी पेरू स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा.
EASY GUAVA CHUTNEY RECIPE IN 10 MINUTES
esakal
पेरूचे तुकडे, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, जिरे, चाट मसाला, मीठ आणि साखर मिक्सरच्या भांड्यात घाला.
EASY GUAVA CHUTNEY RECIPE IN 10 MINUTES
esakal
सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. पेरूमध्ये ओलावा असल्यामुळे सुरुवातीला पाणी घालू नका. चटणी बारीक वाटल्यानंतर त्यात १ ते २ चमचे लिंबाचा रस घालून एकत्र करा.
EASY GUAVA CHUTNEY RECIPE IN 10 MINUTES
esakal
तयार चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्या. तुमची आंबट, गोड, तिखट आणि चटपटीत पेरूची चटणी तयार आहे. ही चटणी भाकरी, चपाती आणि भातासोबत छान लागते.
EASY GUAVA CHUTNEY RECIPE IN 10 MINUTES
esakal
Most Poisonous Fruits in the World
sakal