Anushka Tapshalkar
दिसायला आकर्षक असणाऱ्या या लाल-नारिंगी फळांमध्ये विषारी घटक असतात. ती खाल्ल्याने उलट्या, जुलाब आणि गुंगी येऊ शकते. अधिक प्रमाणात सेवन केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.
Jerusalem Cherry
sakal
या झाडाची फळे लहान सफरचंदासारखी दिसतात आणि त्यांना गोडसर वासही असतो. मात्र, ती खाल्ल्याने पचनसंस्थेला गंभीर इजा होऊ शकते. झाडाचा चीक त्वचेवर पडल्यास फोड येऊ शकतात.
Manchineel
sakal
काटेरी आवरण असणाऱ्या धोतऱ्याच्या फळात विषारी अल्कलॉइड्स असतात. त्याचे सेवन केल्याने भास होणे, हृदयाचे ठोके वाढणे, झटके येणे आणि गंभीर परिस्थितीत मृत्यूही होऊ शकतो.
Datura
sakal
गुंजेच्या शेंगांमध्ये लाल-काळ्या बिया असतात. या बियांमध्ये अॅब्रिन (Abrin) नावाचे अत्यंत विषारी प्रथिन असते. विशेषतः बिया चावून खाल्ल्यास गंभीर विषबाधा होऊ शकते.
Rosary Pea
sakal
कच्च्या एल्डरबेरी तसेच या वनस्पतीच्या काही भागांमध्ये विषारी संयुगे असू शकतात. त्यांचे सेवन केल्याने मळमळ, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. योग्य प्रक्रिया केलेली फळे मात्र काही खाद्यपदार्थांमध्ये वापरली जातात.
Unripe Elderberries
sakal
या वनस्पतीची फळे आणि बिया अत्यंत विषारी असतात. त्यातील घटक हृदयाच्या कार्यावर परिणाम करू शकतात. चुकूनही त्यांचे सेवन करू नये.
Yellow Oleander
sakal
या वनस्पतीची काळी, चमकदार फळे खाण्यायोग्य बेरीसारखी दिसतात. मात्र, त्यामध्ये विषारी घटक असतात. ती खाल्ल्याने तोंड कोरडे पडणे, हृदयाचे ठोके वाढणे, भास होणे आणि गंभीर विषबाधा होऊ शकते.
Deadly Nightshade
sakal
Hibiscus Powder for Skin and Hair
sakal