Yashwant Kshirsagar
पेरु हे थंडीत आणि गरमीत दोन्ही ऋतूंमध्ये सहज मिळणारे फळ आहे. हे चविष्ट आणि आरोग्यदायी असते. आपण अनेकदा पेरु खातो, पण त्याच्या पानांचा वापर केला आहे का?
पेरुच्या पानांमध्ये मॅग्निझ, पोटॅशियम, विविध प्रकारचे जीवनसत्त्व (विटॅमिन), व्हिटॅमिन C, मिनरल्स आणि लाइकोपीन यांसारखी पोषकतत्त्व भरपूर प्रमाणात असतात.
रिकाम्या पोटी पेरुची पाने चावून खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्य फायदे मिळतात. सकाळी याचा नियमित वापर केल्यास चांगला परिणाम दिसतो.
सकाळी उपाशीपोटी पेरुची पाने चावल्यास पाचनसंस्था सुधारते. यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.
या पानांमध्ये जीवनसत्त्वे भरपूर असतात, त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती (इम्यूनिटी) वाढते.
पेरुची पाने उपाशीपोटी खाल्ल्याने रक्तातील साखर (ब्लड शुगर) नियंत्रित राहते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी हे सेवन करणे फायदेशीर ठरते.
पेरुच्या पानांमध्ये असलेले पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हे उपयोगी आहे.
या पानांमध्ये फायबर असते, जे उपाशीपोटी घेतल्यास वजन कमी करण्यास मदत करते. तुम्ही ही पाने उकळूनही घेऊ शकता.
पेरुची पाने स्वच्छ धुवून मग चावून खावीत. त्यानंतर पाणी प्यावे. किंवा ही पाने पाण्यात उकळूनसुद्धा सेवन करता येतात.
ही माहिती सामान्य आरोग्य फायद्यांवर आधारित आहे. कोणतीही वैद्यकीय अडचण असल्यास कृपया आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.