Aarti Badade
दोन्ही फळं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत; मात्र पोषक मूल्यांचा विचार केला तर पेरू अनेक बाबतीत आघाडीवर आहे. पेरूमध्ये व्हिटॅमिन C, फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण चांगले असते.
Guava vs Apple
Sakal
पेरू हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत मानला जातो.हे जीवनसत्त्व रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यास आणि शरीराला अँटीऑक्सिडंट संरक्षण देण्यास मदत करते.
Guava vs Apple
Sakal
पेरूमध्ये भरपूर तंतू म्हणजेच फायबर असते.फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.
Guava vs Apple
Sakal
सफरचंदाच्या तुलनेत पेरूमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते.त्यामुळे संतुलित आहारात पेरूचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
Guava vs Apple
Sakal
पोषणासोबतच पेरू खिशालाही परवडतो! सफरचंदाच्या तुलनेत अनेक ठिकाणी पेरू स्वस्त आणि सहज उपलब्ध असतो.
Guava vs Apple
Sakal
सफरचंदालाही आहारात महत्त्वाचं स्थान आहे.त्यात फायबर आणि विविध अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच, तुलनेने कमी कॅलरी असलेल्या फळांपैकी ते एक आहे.
Guava vs Apple
Sakal
व्हिटॅमिन C आणि फायबरसाठी पेरू उत्तम पर्याय ठरू शकतो, तर सफरचंदही संतुलित आहाराचा भाग बनू शकते. फळांमध्ये विविधता ठेवणे हा सर्वात चांगला पर्याय आहे.
Guava vs Apple
Sakal
Famous Indian Dance Forms
Sakal