'या' मराठी राजाचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली

Anushka Tapshalkar

मराठी नववर्षाचा पहिला दिवस

गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस महाराष्ट्रात गुढ्या उभारून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

First Day Of Marathi New Year | sakal

सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी

गुढीपाडव्याचा संबंध सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीच्या ऐतिहासिक विजयाशी जोडला जातो. याच दिवशी त्याने शक क्षत्रप नहपानावर मोठा विजय मिळवला होता.

Satavahana King Gautamiputra Satakarni | sakal

महाराष्ट्राचे पहिले निर्माते - सातवाहन

सातवाहन घराण्याने सुमारे 450 वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक गिरिदुर्ग, व्यापारी केंद्रे आणि सांस्कृतिक परंपरा समृद्ध केल्या.

Satavahanas- First Producers Of Maharashtra | sakal

क्षत्रपांचा महाराष्ट्रावर अंमल

गौतमीपुत्राच्या आधी क्षत्रप नहपानाचा महाराष्ट्रावर प्रभाव होता. त्याने जुन्नर, पैठण, नाशिक यांसारखी मोठी व्यापारी केंद्रे आपल्या ताब्यात घेतली होती.

Satrap Or Kshatraps Nahapana | sakal

गौतमीपुत्राचा संघर्ष

राज्याभिषेकाच्या वेळी गौतमीपुत्र सातकर्णीचे राज्य फक्त सातारा परिसरापुरते सीमित होते. मात्र, त्याने नहपानाविरुद्ध लढाई सुरू केली.

Gautamiputra Satakarni's Struggle | sakal

नाशिकच्या गोवर्धन युद्धात मोठा विजय

इसवी सन ७८ मध्ये नाशिकजवळील गोवर्धन येथे गौतमीपुत्राने नहपानाचा निर्णायक पराभव केला. यानंतर महाराष्ट्रात सातवाहन सत्ता पुन्हा प्रबळ झाली.

Big Victory in The Govardhan War of Nashik | sakal

त्रीसमुद्रतोयवाहन सातवाहन

गौतमीपुत्राने आपल्या राज्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेर आंध्रप्रदेशापर्यंत केला. व्यापार, किल्ले आणि दळणवळण व्यवस्था सुधारली, ज्यामुळे सातवाहनांचा प्रभाव वाढला.

Trisamudratovahan Satavahana | sakal

गुढीपाडवा - विजयाचे प्रतीक

गौतमीपुत्राच्या या ऐतिहासिक विजयाची आठवण म्हणून महाराष्ट्रात गुढी उभारली जाते. ही गुढी विजयाचे व समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

Gudi Padwa- Symbol Of Victory | sakal

ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज

गुढीपाडवा साजरा करताना आपण हा ऐतिहासिक वारसा लक्षात ठेवायला हवा. मराठी संस्कृतीतील हा एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जातो.

The Need to Preserve Historical Heritage | sakal

गुढी पाडव्याला काय खरेदी करावं अन् काय करु नये?

What to buy and what to avoid on gudi padwa

|

sakal

आणखी वाचा