गुजरातमध्ये पुरुष मंडळी साड्या नेसून गरबा का खेळतात?

संतोष कानडे

नवरात्र

नवरात्र हा गुजराती लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवसांमध्ये सर्वत्र उत्साह असतो.

दांडिया

नवरात्रमध्ये दांडिया आणि गरब्याची धूम सुरु असते. जसं महिला चनिया चोली घालतात तसंच पुरुषही केडिया नेसतात, फेटा बांधतात.

अहमदाबाद

मात्र अहमदाबाद येथे एक असा समूदाय आहे ज्यातले पुरुष मंडळी साडी नेसून गरबा खेळतात.

बडोत

अहमदाबादमध्ये बडोत समाजाचे लोक राहतात. या समाजातील पुरुष दुर्गाष्टमीच्या दिवशी साडी नेसतात आणि गरबा करतात.

शेरी गरबा

या प्रकाराला शेरी गरबा म्हटलं जातं. कुटुंबाची समृद्धी आणि लहान मुलांच्या रक्षणाची याचना ते देवीकडे करतात.

आख्यायिका

यामागे एक आख्यायिका आहे. साधारण २०० वर्षांपूर्वी बडोत समाजाच्या वस्तीमध्ये सदुबेन नावाची महिला रहायची.

मदत

तिच्यावर अत्याचार झाले तेव्हा तिने बडोत समाजाच्या पुरुषांना हाक दिली. पण कोणीही मदतीला आलं नाही.

श्राप

मग तिने बडोत समाजाच्या पुरुषांना श्राप दिला आणि स्वतःच्या मुलाची हत्या केली. यामुळे समाजातील पुरुष भयभीत झाले.

भीती

तिच्या श्रापामुळे समाजाचं भलं होणार नाही, समाजातील सगळ्या मुलांना ती मारेल, अशी पुरुषांना भीती आहे.

मंदिर

चुकीचं प्रायश्चित्त म्हणून बडोत समाजातील लोकांनी सदुबाचे मंदिर बांधले आणि गरबा करण्याची परंपरा सुरु झाली.

गरबा

नवरात्रीच्या आठव्या दिवशी बडोत समाजाचे पुरुष साड्या नेसून सदुबाच्या मंदिरामध्ये गरबा करतात. त्यामुळे देवीचा राग कमी होईल, अशी श्रद्धा आहे.

शरीराला ऊर्जा देणारे घटक किती आणि कोणते?

<strong>येथे क्लिक करा</strong>