बेळगावी कलाकंद बनवा अगदी सोप्या स्टेप्समध्ये!

Aarti Badade

अस्सल बेळगावी कलाकंद

कलाकंद हा बेळगाव (Belagavi) भागात खास प्रसिद्ध असलेला पारंपरिक दुग्धजन्य पदार्थ आहे.याची चव किंचित गोड-आंबट अशी मिश्रित असते.आज आपण गुलकंद (Gulkand) फ्लेवरचा कलाकंद बनवणार आहोत!

Sakal 

लागणारे साहित्य

१ लिटर पूर्ण मलई दूध, १/२ लिंबाचा रस, १/२ कप साखर, २ टेबलस्पून गुलकंद, १ टिस्पून केशर इलायची सिरप, १/२ टिस्पून वेलची पूड, ७-८ काजू-बदामाचे काप

Sakal 

पनीर तयार करण्याची सुरुवात

१/२ लिटर दूध एका भांड्यात गरम करत ठेवा. उरलेले १/२ लिटर दूध आटवण्यासाठी जाड बुडाच्या पॅनमध्ये ठेवा.

Sakal 

लिंबाचा रस

भांड्यातील दूध गरम झाले की त्यात लिंबाचा रस टाकून गॅस बंद करा.दूध एकाच दिशेने ढवळत राहा.

Sakal 

पनीर वेगळे करा

दूध ढवळत राहिल्यावर नासण्याची प्रक्रिया चालू होईल आणि पनीर वेगळे झालेले दिसेल.पांढरा सुती कपडा चाळणीवर ओला करून ठेवा आणि त्यावर नासलेले दूध ओता.सगळे पाणी पिळून काढून टाका.

Sakal 

आंबटपणा काढा आणि गुलकंद मिक्स करा

गाळलेले पनीर फडक्यात असतानाच गार पाण्याने थोडे धुऊन घ्यावे, म्हणजे लिंबाची आंबट चव निघून जाईल.

Sakal 

गुलकंद

पनीर एका बाऊलमध्ये काढून त्यात २ टेबलस्पून गुलकंद टाकून चांगले मिक्स करा. हे मिश्रण बाजूला ठेवा.

Sakal 

दूध आटवा आणि साखर घाला

पॅनमधले दूध बासुंदीसारखे आटवा.दूध थोडे आटले की, त्यात १/२ कप साखर (किंवा १ कप पिठीसाखर) टाकून विरघळेपर्यंत ढवळा.

Sakal 

पनीरचे मिश्रण आणि फ्लेवर

साखर विरघळल्यावर गुलकंद मिक्स केलेले पनीरचे मिश्रण टाकून ढवळा.त्यात केशर इलायची सिरप आणि वेलची पूड टाकून मिक्स करा. टीप: मिश्रण जास्त कोरडे करू नका; कलाकंद थोडा ओलसर हवा.

Sakal 

सेट करा

मिश्रण घट्ट होत आले की, तूप लावलेल्या टिनमध्ये (Tin) काढा.वरून काजू-बदामाचे काप टाका.दोन तासांसाठी फ्रिजमध्ये सेट (Set in Fridge) करायला ठेवा.

Sakal 

कलाकंद तयार!

गार झाल्यावर कलाकंदच्या वड्या पाडून घ्या.अस्सल बेळगावी गुलकंद कलाकंद खाण्यासाठी तयार!

Sakal 

दिवाळी फराळ! तांदळाच्या पिठाचे बोर बनवण्याची पारंपरिक रेसिपी

Rice Flour Bore Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा