दिवाळी फराळ! तांदळाच्या पिठाचे बोर बनवण्याची पारंपरिक रेसिपी

Aarti Badade

दिवाळीचा पारंपरिक पदार्थ

कोकणी स्पेशल तांदळाच्या पिठाचे बोर हा दिवाळी फराळातील एक खास आणि पारंपरिक पदार्थ आहे.नाश्त्याला गोड आणि खुसखुशीत पदार्थ हवा असल्यास ही रेसिपी नक्की ट्राय करा.

Rice Flour Bore Recipe

|

Sakal

बोरसाठी लागणारे साहित्य

तांदळाचे पीठ: १ वाटी,भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पावडर: ½ वाटी, बारीक केलेला गूळ किंवा साखर: ½ वाटी, भाजलेले सफेद तीळ: ¼ वाटी, वेलची पूड: १ चमचा, तूप: १ चमचा, मीठ (ऐच्छिक).

Rice Flour Bore Recipe

|

Sakal

कोरडे मिश्रण एकत्र करा

एका मोठ्या भांड्यात तांदळाचे पीठ, खोबऱ्याची पावडर, गूळ/साखर, तीळ आणि वेलची पूड एकत्र करा. त्यात तूप आणि चवीनुसार मीठ (ऐच्छिक) घालून मिश्रण चांगले मिक्स करा.

Rice Flour Bore Recipe

|

Sakal

मिश्रण मळून घ्या

आता गरम पाणी किंवा गरम दूध थोडे थोडे घालत मिश्रण मळून घ्या. कणिक खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावी. मऊसर गोळा तयार करा.

Rice Flour Bore Recipe

|

Sakla

गोळे बनवा

मळलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवा. (यालाच 'बोर' म्हणतात). गोळे करताना हलके हात वापरा, ज्यामुळे तळल्यावर ते खुसखुशीत होतील.

Rice Flour Bore Recipe

|

Sakal

तळण्याची पद्धत

एका कढईत तेल गरम करा आणि गोळे मध्यम आचेवर तळा. गोळे सोनेरी (Golden Brown) रंगाचे होईपर्यंत तळून घ्या, म्हणजे ते आतूनही शिजतील.

Sakal

बोर तयार!

तळलेले बोर थंड झाल्यावर दिवाळीच्या फराळात सर्व्ह करा. हे पारंपरिक आणि स्वादिष्ट बोर दीर्घकाळ टिकतात आणि चवीला अप्रतिम लागतात!

Rice Flour Bore Recipe

|

Sakal

बिस्किटासारख्या खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटणाऱ्या गव्हाच्या शंकरपाळ्या कशा बनवाल?

Sakal

येथे क्लिक करा