दिल्ली जिंकणारे शिंदे जोतिबासमोर व्हायचे नतमस्तक; जाणून घ्या अभिमानाची कथा

संतोष कानडे

पराक्रम आणि श्रद्धा

दिल्लीवर राज्य करणारे शिंदे जोतिबासमोर नतमस्तक व्हायचे. शिंद्यांची श्रद्धा आणि पराक्रमाचा हा इतिहास आहे.

मातीतला देव

त्यांचा देव दिल्लीच्या महालात नव्हता, तर कोल्हापुरातल्या वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर होता.

इतिहासातील वाक्य

“डोंगरचा जोतिबा, छत्रपतींचा भगवा ध्वज” हे शिंद्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे.

राजमुद्रेतही जोतिबा

शिंद्यांच्या राजमुद्रांची सुरुवात ‘श्री जोतीस्वरूप चरणी तत्पर’ अशी होत असे.

नावांमध्येही श्रद्धा

राणोजी शिंद्यांनी मुलाचं नाव जोतिबा ठेवलं होतं.

मंदिराचा जीर्णोद्धार

1730 साली राणोजी शिंद्यांनी जोतिबा मंदिराचा भव्य जीर्णोद्धार केला.

भव्य बांधकाम

काळ्या दगडात उभारलेला केदारलिंगाचा गाभारा आणि उंच शिखर आजही पाहायला मिळते.

इतर मंदिरांची उभारणी

केदारेश्वर आणि यमाई देवीची मंदिरेही शिंद्यांनी उभारली होती.

परंपरा आजही कायम

जोतिबाच्या यात्रेत पहिला नैवेद्य शिंदे घराण्याचा असतो, ही परंपरा आजही कायम आहे.

श्रद्धेचा वारसा

सत्ता आणि संपत्ती असूनही शिंद्यांनी आपली मुळे जोतिबाच्या चरणीच ठेवली. श्रद्धेचा वारसा कधीही विसरला नाही.

महाराष्ट्रात सर्वात शुद्ध सोनं कुठे मिळतं?

<strong>येथे क्लिक करा</strong>