Aarti Badade
जिममध्ये जास्त व्यायाम केल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो, विशेषतः ज्यांना हृदयाचे आजार किंवा संबंधित धोके आहेत.
व्यायामादरम्यान किंवा लगेच नंतर हृदयातील रक्तप्रवाह अचानक थांबणे, ज्यामुळे रक्ताचा पुरवठा खंडित होतो.
आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने, विशेषतः तीव्र वर्कआउट्स किंवा जड वेटलिफ्टिंगमुळे, हृदयावर ताण येतो.
कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा अॅरिथमियासारखे आजार तीव्र व्यायामामुळे समोर येऊ शकतात. नियमित तपासणी आवश्यक.
वॉर्म-अप न करणे किंवा कूल-डाउन वगळणे यामुळे हृदयावर अनावश्यक ताण येऊ शकतो.
जास्त घाम आल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स (उदा. पोटॅशियम, सोडियम) बिघडतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
कार्यक्षमता वाढवणारे काही सप्लिमेंट्स, स्टिरॉइड्स हृदय गती आणि रक्तदाब वाढवून धोका निर्माण करतात.
व्यायामाच्या शारीरिक ताणासोबत मानसिक ताण आणि चिंता आल्यास हृदय जास्त उत्तेजित होते.
कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, हळूहळू प्रगती करा, हायड्रेटेड रहा आणि अति व्यायाम टाळा.