संतोष कानडे
पुण्यातल्या मुळशी तालुक्यातील भूकुम येथील हगवणे कुटुंबियांच्या सुनेचा दुर्वैदी मृत्यू झाला आहे.
सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने जीव दिल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं जात आहे.
पैसे, महागड्या वस्तू यासासाठी वैष्णवीचा सातत्याने छळ होत होता, असं आता पुढे येतंय.
या प्रकरणी पोलिसांनी पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, दीर सुशील, नणंद करिष्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपी अटक केली असून आरोपींपैकी राजेंद हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार आहेत.
हगवणे कुटुंबियांची मोठी सून आणि सुशील हगवणे याची पत्नी मयुरी हगवणे हिचादेखील सासरच्यांनी छळ केला होता.
तिने तेव्हा पोलिसांत धाव घेतली होती, महिला आयोगाकडे तक्रारही केली होती, परंतु तिला न्याय मिळाला नाही.
सुशील हगवणेत्यामुळे मयुरीने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. तिचा पती सुशील हगवणे याने तिची खंबीर साथ दिली होती.
मयुरीने हगवणे कुटुंबियांचं खरं रुप जनतेसमोर आणलं आहे. दोघी सुनांचे ते कसा छळ करत होते, हेदेखील तिने सांगितलं
हगवणे कुटुंबियांचं उत्पन्नाचं साधन म्हणजे जमिनी घेऊन त्याचे प्लॉट पाडून विकणे हे आहे
तसेच कुटुंबियांकडे जेसीबी, पॉकलँड अशा मशिनरी आहेत. हे सगळं शशांक बघतो, असं मयुरी यांनी वृत्तवाहिनीला सांगितलं
तर सासरे राजेंद्र हगवणे यांचा कुठला वेगळा व्यवसाय आहे का, याबद्दल त्यांनी माहिती नसल्याचं म्हटलं.