सकाळ डिजिटल टीम
लिंबाच्या (लिंबू) सालीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केसांची मुळे मजबूत करून केसगळती कमी करण्यात मदत करतात. चला जाणून घेऊया लिंबाच्या सालीचा विविध प्रकारे कसा उपयोग करता येतो ते..
कृती : दोन लिंबांच्या साली पाण्यात उकळा आणि ते मिश्रण थंड होऊ द्या.
वापर : केस धुतल्यावर शेवटी या पाण्याने केस धुवा.
फायदा : टाळूतील अशुद्धता कमी होते आणि केस चमकदार होतात.
साहित्य : २ चमचे लिंबाच्या सालीची पावडर + ३ चमचे ताजे दही
कृती : दोन्ही घटक चांगले मिसळा आणि टाळूवर लावा.
वेळ : ३० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.
फायदा : टाळूचं पोषण होतं आणि केसांचा कोरडेपणा कमी होतो.
साहित्य : एक कप वाळलेल्या लिंबाच्या साली + एक कप नारळ तेल
कृती : आठवडाभर हे मिश्रण ठेवून द्या.
वापर : हे तेल गरम करून टाळूवर हलके मालिश करा.
वेळ : ४० मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस धुवा.
फायदा : केसांची मुळे बळकट होतात व केसगळती कमी होते.
साहित्य : २ चमचे लिंबाच्या सालीची पावडर + ३ चमचे कोरफडीचे जेल
कृती : मिश्रण एकत्र करून टाळूवर लावा.
वेळ : ३० मिनिटांनंतर धुवा.
फायदा : केस मऊ व गुळगुळीत होतात.
साहित्य : २ चमचे लिंबाच्या सालीची पावडर + २ चमचे मध
कृती : हे मिश्रण केसांना आणि टाळूवर लावा.
वेळ : २०–३० मिनिटांनंतर धुवून टाका.
फायदा : केसांना पोषण मिळतं आणि नैसर्गिक चमक वाढते.