Aarti Badade
जवसाच्या बियांमध्ये असते ओमेगा-3, व्हिटॅमिन ई आणि अनेक पोषक तत्व – जे केसांसाठी अत्यंत फायदेशीर असतात.
ओमेगा-3 फॅटी ऍसिड केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवतात. केसांची घनता आणि ताकद वाढते.
व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना बळकटी देतात. केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.
नैसर्गिक तेलामुळे केसांना नैसर्गिक चमक येते. कोरडे आणि निस्तेज केस मऊसर होतात.
अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे टाळूतील कोरडेपणा आणि कोंडा कमी होतो.
नियमित सेवनाने आणि बाहेरून लावल्याने केस लांब आणि मजबूत वाढतात.
गरम करून बनवलेलं जवसाचं तेल केसांना लावल्यास मुळांपर्यंत पोषण मिळतं.
जवसाच्या बिया पाण्यात उकळवून तयार झालेलं जेल केसांवर लावा.
भिजवलेल्या बियांचं पाणी केसांवर लावून काही वेळ ठेवा.
रोज 1-2 चमचे जवसाचं सेवन केल्याने शरीरातूनही केसांना पोषण मिळतं.
नैसर्गिक उपाय नियमितपणे केल्यासच चांगले परिणाम दिसून येतात. त्वचा किंवा केसांची काही विशेष समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.