Anushka Tapshalkar
अंडी प्रत्येकाच्या दैनंदिन आहाराचे एक अविभाज्य भाग आहेत.
अंड्यांमध्ये प्रोटीन, बायोटीन आणि आवश्यक फॅटी ॲसिडस् असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषकघटक आहेत. अंडी केसांना मजबुती देतात, त्यांची वाढ सुधारतात, आणि स्कल्पच मोईस्चर टिकवून कोरडेपणा दूर करतात.
तुमच्या केसांच्या लांबीनुसार एक किंवा दोन अंडी फेटून थेट तुमच्या स्कॅल्पला आणि संपूर्ण केसांना लावा. २० ते ३० मिनिटांनी कोमट पाण्याने केस धुवा. तसेच केसांच्या मुलायमतेसाठी तुम्ही मध किंवा तुमच्या पसंतीचे तेल वापरू शकता.
अंडी खराब झालेल्या केसांचे फॉलिकल्स दुरुस्त करण्यात मदत करतात. यामुळे दाट आणि निरोगी केसांच्या वाढीला चालना मिळते.
अंड्यातील पोषकतत्त्वे पातळ होणाऱ्या केसांची चमक वाढवतात तसेच केस पुन्हा लवचिक होण्यास मदत करतात.
अंडी केसांची मुळे मजबूत करायला मदत करतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते आणि नवीन केसही उगवतात.
तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये अंड्याचा समावेश केलयास स्कॅपलचेही आरोग्य सुधारू शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.