Saisimran Ghashi
हल्ली लोकांमध्ये केसगळतीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे केस कमजोर होणे, कोंडा होणे, केस न वाढणे अशा समस्या देखील वाढू लागतात.
पण तुम्ही एकदम स्वस्त आणि फायदेशीर तेल लावून केस गळती कायमची थांबवू शकता आणि केस मजबूत बनवू शकता.
कांद्याचा रस आणि खोबरेल तेलात मिसळून लावल्याने केस गळती कमी होऊन केस वाढू लागतात.
रोजमेरी तेल आणि खोबरेल तेल एकत्र मिसळून लावणे केसांसाठी खूप फायदेशीर ठरते.
खोबरेल तेलात कोरफड आणि व्हिटॅमिन ई मिक्स करून लावल्याने केस गळतीबरोबर कोंडा देखील कमी होतो.
मेथी दाण्याची पेस्ट आणि खोबरेल तेल मिक्स करून केसांना लावल्याने केस गळती थांबून केस चमकदार होतात.
केसांना तेल लावल्यावर ते 5 ते 6 तास राहू द्या आणि त्यांतर कोमट पाण्याने केस धुवून टाका.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.