हेअर स्टायलिंग आणि कलरिंगमुळे केसांची चमक गेलीय? मग, 'या' नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर

Monika Lonkar –Kumbhar

आपल्या केसांमुळे आणि चेहऱ्यामुळे व्यक्तिमत्व आकर्षक दिसण्यास मदत होते. त्यामुळे, त्वचेसोबतच केसांची ही काळजी घेणे फार महत्वाचे आहे. 

Hair Care Tips

हेअर स्टायलिंग

आजकाल हेअर स्टायलिंग करण्याचे महिलांमध्ये प्रमाण वाढले आहे.

Hair Care Tips

अनेक महिला हेअर स्टायलिंग आणि कलरिंग करण्यावर भर देत आहेत. 

Hair Care Tips

केस खराब होण्याची शक्यता

मात्र, सतत हेअर स्टायलिंग आणि कलरिंग केल्यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते. यासोबतच केसांची चमक देखील जाते. केसांच्या या समस्या रोखण्यासाठी आणि केसांची चमक मिळवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक हेअर मास्कची मदत घेऊ शकता. या हेअर मास्कमुळे केसांना अंतर्गत पोषण मिळते आणि केसांना सुंदर चमक देखील येते. 

Hair Care Tips

ओटमील

ओटमील हे आरोग्यासोबतच आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहित आहे का? या ओटमीलपासून आणि नारळाच्या तेलापासून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता. 

Hair Care Tips

सर्वात आधी ओटमील पाण्यात भिजवा आणि मिक्सरला बारीक करून घ्या. आता या पेस्टमध्ये खोबरेल तेल मिसळा. त्यानंतर, केसांना हा हेअर मास्क लावा. ४०-४५ मिनिटांनंतर केस थंड पाण्याने धुवून टाका. 

Hair Care Tips

या हेअरमास्कमुळे तुमच्या केसांना चमक तर मिळेलच शिवाय, केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

Hair Care Tips

कोरोनानंतर आता 'पॅरट फेवरचे' संकट, जाणून घ्या लक्षणे

parrot fever