कोरोनानंतर आता 'पॅरट फेवरचे' संकट, जाणून घ्या लक्षणे

Monika Lonkar –Kumbhar

कोरोना

मागील ४ वर्षांपासून कोरोनाच्या धोक्यांपासून थोडा जरी दिलासा मिळाला असला तरी, सध्या युरोपीय देशांमध्ये आणखी एका संसर्गजन्य आजार वाढल्याचे समोर आले आहे. या आजाराचे नाव आहे पॅरट फेवर.

parrot fever

पॅरट फेवर

काही रिपोर्टनुसार, युरोपातील अनेक देशांमध्ये पॅरट फेवरचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, इतकेच नाही तर आतापर्यंत या आजारामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे डेन्मार्कमध्ये चार आणि नेदरलँडमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

parrot fever

पॅरट फेवर काय आहे?

पॅरट फेवरला सिटाकोसिस असे ही म्हटले जाते. क्लॅमायडिया सिटासी या जिवाणूमुळे होणारा दुर्मिळ परंतु गंभीर जिवाणू संक्रमण आहे.

parrot fever

हा संसर्ग प्रामुख्याने पक्ष्यांना, विशेषतः पोपट, कबूतर आणि कोंबड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने, मानवांमध्ये देखील हा संसर्ग होण्याचा धोका आहे.

parrot fever

पॅरट फेवरची लक्षणे कोणती ?

संसर्ग झालेल्या पक्ष्यांमध्ये सुरूवातीला कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. महिन्याभरानंतर ही काही लक्षणे दिसू शकतात. संसर्ग झालेलाे पक्षी अनेक महिने या जिवाणूंसोबत जगू शकतात.

parrot fever

पॅरट फेवरचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये खोकला, छातीत दुखणे, डोकेदुखी यांसह न्यूमोनियासारखी लक्षणे दिसू शकतात.

parrot fever

काही लोकांना श्वास घेण्यास त्रास होणे, ताप येणे, स्नायू दुखणे, तीव्र डोकेदुखी आणि गॅस्ट्रोनॉमिक लक्षणे देखील दिसू शकतात.

parrot fever

पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे मसूर डाळ

Benefits of Masoor Dal