केसांना रात्री तेल लावणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत!

Aarti Badade

रात्री तेल लावण्याचे धोके

केसांना रात्री तेल लावून झोपणे तज्ज्ञांच्या मते योग्य नाही, कारण यामुळे टाळूवर फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) होण्याची शक्यता वाढते.

Sakal

कोंडा आणि मूळ

जास्त काळ केसांवर तेल राहिल्यास, तेलामुळे टाळूची त्वचा जास्त तेलकट राहते आणि केसांमध्ये कोंडा (Dandruff) होतो, तसेच केसांची मूळ देखील खराब होऊ शकतात.

Sakal

त्वचेला ऍलर्जी

रात्री तेल लावून झोपल्यामुळे ते तेल चेहऱ्यावरील त्वचेच्या संपर्कात येते, ज्यामुळे त्वचेला ऍलर्जी (Skin Allergy) होऊ शकते आणि पिंपल्स (Pimples) येण्याची शक्यता वाढते.

Sakal

तेल लावण्याची योग्य वेळ

केस धुण्याच्या एक ते दोन तास आधी केसांना तेल लावणे सर्वात योग्य असते, यामुळे केस जास्त चिकट होत नाहीत.

Sakal

पोषण आणि तेल शोषून घेणे

या एक ते दोन तासांच्या कालावधीत केसांना आणि टाळूला पुरेसे पोषण मिळते आणि तेल त्वचेमध्ये व्यवस्थित शोषले जाते.

Sakal

गरम तेल आणि मसाज

तेल नेहमी कोमट करून केसांना लावावे आणि लावताना चांगला मसाज करावा, यामुळे रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते व केसांची वाढ चांगली होते.

Sakal

केस गळती कमी

तेलाचा चांगला मसाज केल्यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते, ज्यामुळे केस गळती (Hair Loss) कमी होण्यास मदत होते.

Sakal

भेगा पडलेल्या टाचा लपवू नका, बऱ्या करा! घरगुती सोप्या उपायांनी मिळवा मऊ त्वचा!

Sakal

येथे क्लिक करा