दिवाळी फराळ! मोतीचूर लाडू, अगदी हलवाई स्टाइल! नोट करा ही सोपी रेसिपी

Aarti Badade

दिवाळी फराळातला राजा : मोतीचूर लाडू

दिवाळी म्हटलं की घरात लाडू हवेच! पण मोतीचूर लाडू (बुंदी लाडू) ची गोष्टच वेगळी. चला तर मग, यंदा घरीच बनवा हा चविष्ट आणि पारंपरिक पदार्थ!

Sakal

साहित्य

१ किलो बेसनची बुंदी, १ किलो साखर, तेल, दीड टेबलस्पून वेलची पावडर, १/२ वाटी काजूचे तुकडे, १/२ वाटी मगज बी, मीठ (चवीनुसार).

Sakal

मोतीचूर बुंदी तयार करा

बेसन पीठ बारीक दळून आणावे.त्यात चिमूटभर मीठ घालून पीठ सरसरीत भिजवून घ्यावे.बुंदी मोतीचूरची असल्याने, बारीक झार्याने वापरून बारीक बुंदी पाडून घ्यावी.

Sakal

एकतारी पाक तयार करा

१ किलो साखर घेऊन, ती बुडेल एवढे पाणी घालावे. मध्यम आचेवर पाक उकळू द्यावा आणि साखर विरघळेपर्यंत सतत हलवावा.

Sakal

पाक

पाक एकतारी झाल्यावर गॅस बंद करून त्यात वेलची पावडर आणि असल्यास केशर वेलची सिरप घालावे.

Sakal

बुंदी पाकात मुरवा

पाक थोड्या थंड झाल्यावर त्यात तयार बुंदी घालावी आणि छान हलवून घ्यावी.बुंदी झाकून किमान अर्धा तास तरी ठेवावी जेणेकरून ती छान मुरेल. मधून मधून हलवून पाहावे.

Sakal

लाडू वळण्याची खास टीप

लाडू वळण्यास घेण्यापूर्वी, मगज बी आणि काजूचे तुकडे बुंदीत मिसळा.लाडू घट्ट वळण्यास घ्यावे. जास्त पाक झाल्यास किंवा कमी पडल्यास, थोडा पाक बाजूला काढून ठेवा.

Sakal

दिवाळीसाठी ५ मिनिटांत तयार करा खमंग, कुरकुरीत इन्स्टंट जलेबी!

Instant Jalebi Recipe

|

sakal

येथे क्लिक करा