विजयनगर साम्राज्याची राजधानी 'हंपी' : इतिहास, वास्तूशैली अन् निसर्गसौंदर्याचा अद्वितीय संगम

सकाळ डिजिटल टीम

हंपी

कर्नाटकमधील हंपी, ज्याला विजयनगर म्हणूनही ओळखलं जातं. हे भारतातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नेत्रदीपक पुरातत्त्वीय स्थळ आहे.

Natural Beauty of Hampi

तुंगभद्रेच्या काठावर वसलेली प्राचीन नगरी

तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेली ही प्राचीन नगरी मंदिरं, राजवाडे, चौक, मनोरे, पूल आणि भव्य मूर्ती यांचं अफाट दृष्य सादर करते.

Natural Beauty of Hampi

हंपीचं नैसर्गिक सौंदर्य अद्वितीय

हंपीचं नैसर्गिक सौंदर्यही तितकंच अद्वितीय आहे. प्रचंड खडक, डोंगररांगा आणि पाण्याच्या प्रवाहांनी वेढलेली ही जागा एक वेगळाच अनुभव देते.

Natural Beauty of Hampi

कोणताही कृत्रिमपणा नाही

विशेष म्हणजे, येथे कोणताही कृत्रिमपणा नाही. पुरातत्त्व विभागाने कोणतीही सजावट केली नसून, सर्व स्मारकं त्यांच्या मूळ नैसर्गिक अवस्थेत आजही उभी आहेत.

Natural Beauty of Hampi

पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरेची सांगड

हंपीचं महत्त्व पौराणिकदृष्ट्याही मोठं आहे. रामायणामधील किष्किंधा नगरी म्हणजेच आजचं हंपी, असं मानलं जातं. येथेच प्रभू रामाला वानरसेनेने रावणाकडून सीतेला परत मिळवण्यासाठी मदत केली होती.

Natural Beauty of Hampi

विजयनगर साम्राज्याची राजधानी

ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं, तर 14 व्या ते 16 व्या शतकात हे विजयनगर साम्राज्याची राजधानी होतं. एक शक्तिशाली, संपन्न आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध राज्य.

Natural Beauty of Hampi

विजयनगरचा पराभव

1565 मध्ये दक्षिण भारतातील मुस्लिम सुलतानांच्या संयुक्त आक्रमणात विजयनगरचा पराभव झाला आणि त्यानंतर हंपीचं वैभवशाली अस्तित्व ओसरलं. परंतु, आजही ही नगरी इतिहासाच्या पाऊलखुणा जपून उभीये.

Natural Beauty of Hampi

हंपीचा परिसर प्रचंड मोठा

हंपीचा परिसर प्रचंड मोठा आहे. इथं तासन्‌तास भटकंती करता येते आणि अनेकदा एखादं कोपऱ्यातील मंदिर किंवा अवशेष शोधून काढणं हा एक शोधमोहिमेसारखा अनुभव असतो.

Natural Beauty of Hampi

हंपी पाहण्यासाठी किती दिवस लागतात?

संपूर्ण हंपी पाहण्यासाठी काही दिवस हवेत, पण तीन दिवसांत प्रमुख स्थळं पाहून समाधानकारक अनुभव घेता येतो आणि त्यात कंटाळाही येत नाही.

Natural Beauty of Hampi

साताऱ्याच्या बामणोली डोंगरात लपलंय हेमाडपंथी मंदिर; 1000 वर्षांची आध्यात्मिकता अन् अद्वितीय शिल्पकला

Pateshwar Temple Satara | esakal
येथे क्लिक करा