सकाळ डिजिटल टीम
सातारा जिल्ह्यातील देगाव गावाजवळ बामणोली डोंगररांगेत पाटेश्वरचे हेमाडपंथी मंदिर आणि प्राचीन लेणीसमूह स्थित आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ विशाल पुष्करणी, मठ आणि मुख्य मंदिराकडे नेणाऱ्या पायर्या आहेत.
या मंदिराचा जीर्णोद्धार १८ व्या शतकात सरदार अनगळांनी केला.
येथे शिवलिंग आणि मूर्तिरूपातील दोन्ही स्वरूपे आहेत.
चतुर्मुख शंकरमूर्ती, अनेक प्रकारची सयोनी, अयोनी, चतुर्मुख, धारालिंग, सहस्त्रलिंग आणि तांत्रिक शिवलिंगे येथे कोरलेली आहेत.
विशेष म्हणजे एका मूर्तीत त्रिशुळ, कमंडलू, सर्प, अर्धचंद्र व तिसरा डोळा यामुळे ती शंकराचीच मूर्ती आहे हे स्पष्ट होते.
मुख्य आकर्षण म्हणजे गूढरम्य लेणीसमूह. या लेण्या सुमारे १०००-१२०० वर्षे जुन्या असून शिलाहार काळातील असल्याचे मानले जाते.
इथे विविध रचनांमध्ये हजारो शिवलिंगे, काहींवर देवी, विष्णू, सूर्य यांची कोरीव मूर्ती आणि त्यांच्या भोवती असंख्य लिंगे कोरलेली आहेत.
हे प्रतिकात्मक शिल्पांकन अत्यंत दुर्मीळ आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे.
लेण्यांच्या गुहांमध्ये अंधार, एकाकीपणा आणि तांत्रिक पूजा यामुळे इथे फिरताना दडपण जाणवते.
मात्र इतिहास, तंत्रशास्त्र व शिल्पकलेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी पाटेश्वर हा एक अनमोल ठेवा आहे.