Monika Shinde
रामभक्त हनुमंताची शहरात विविध ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. चला तर मग जाणून घेऊया सोलापुरातील ऐतिहासिक मंदिराबद्दल
दंडवते महाराज मठातील हनुमानाची मूर्ती ही महाराष्ट्रातील एकमेव ११ मुखी, २२ हातांची आणि दासमुद्रेत बसलेली चार फूट उंच मूर्ती आहे. १९८२ मध्ये चेन्नईच्या मूर्तिकार राधकिशन यांनी स्वप्नात दिसलेल्या रूपानुसार ती तयार केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील हे पुरातन मंदिर महाकांळबाबांनी निर्माण केलं आहे. कमलदलात बसलेली लाडू खाणारी दासमुद्रेतील मूर्ती आणि कमानीवरची छाती फाडलेली सात फूट उंच मूर्ती विशेष आकर्षण ठरतात.
लक्ष्मी मार्केटमधील हे पुरातन मारुती मंदिर 'वेशीचा मारुती' म्हणून ओळखलं जातं. येथे श्री प्रभाकर महाराज विश्रांती घेत असत, असे पुजारी राजेश बोरगावकर सांगतात. चार फूट उंच मूर्तीला रोज नित्योपचार केले जातात.
४०० वर्ष जुनं, सहा फूट उंच पंचमुखी मारुती मंदिर पंचकट्ट्यासमोर आहे. मागे राम मंदिर असून, येथे प्रभाकर महाराज साधना करायचे. शेजारी सिद्धीविनायकसारखी गणेश मूर्ती व हलणाऱ्या शाळुंकेसह पंचसुत्री शिवलिंग आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील हे मंदिर पुण्यातील सोन्या मारुतीच्या नावावर आहे. संगमरवरी मूर्ती सुमारे दोन फूट उंच असून, नवसाला पावणारा मारुती म्हणून प्रसिद्ध. हे स्वातंत्र्यसैनिकांचे एक चर्चास्थळ होते.
महाबलीपुरममध्ये घडवलेली, सव्वा चार फूट उंच काळ्या पाषाणातील मूर्ती. पंचमुखांमध्ये वराह, गरुड, नरसिंह, हयग्रीव आणि मारुती यांचा समावेश. मंदिरात विविध देवतांच्या मूर्ती आणि अलंकारयुक्त हनुमंत मूर्ती आहे.
पूर्वी चौकाच्या मध्यभागी असल्यामुळे 'मधला मारुती' नाव पडलं. मूर्तीच्या पाठशिळेवर शिलालेख असून, मंदिराजवळ शिवयोगी सिद्धरामेश्वरस्थापित ६८ लिंगांपैकी ४४ वे सोमेश्वर लिंग आहे.
स्वातंत्र्यलढ्याचा ऐतिहासिक भाग इथेच ६ मे १९३० रोजी कोर्ट जळीत प्रकरणाचा कट रचला गेला. तीन फूट उंच, आशीर्वाद देणारी लोभस मूर्ती आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलं स्थान.
भुईकोट किल्ल्याच्या तटाजवळचं मंदिर, १८१८ च्या इंग्रज-मराठा लढाईचा साक्षीदार. इंग्रजांनी याच मंदिराच्या आधाराने तोफा मांडल्या. मूर्ती थोडी अस्पष्ट असली तरी मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व कायम आहे.