पुजा बोनकिले
पुणे हे शहर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.
तसेच हे शहर व्यापार आणि उद्योगाशिवाय ऐतिहासिक वास्तूंसाठी देखील प्रसिद्ध आहे.
पुण्यात अनेक प्राचीन मंदिर आहेत. त्यातील काही मारूती मंदिरांची नावे महाराष्ट्रात चर्चेत आहेत.
यंदा १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या दिनानिमित्त पुण्यातील बटाटा, भांग्या, जिलब्या पुण्यातील मारूती मंदिरांची विचित्र नावं कशी पडली हे जाणून घेऊया.
पुण्यातील शनिवार वाडा येथील मैदानात हे मंदिर आहे. पेशव्यांच्या काळात या मैदानात शनिवारी बटाटा-कांद्यांचा मोठा बाजार भरत असे. यामुळे या मंदिराला बटाटा मारूती म्हणतात.
श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे जाताना उजव्या बाजूला भांग्या मारूतीचे मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात गांजा विकला जात होता असे सांगितले जाते.यामुळे या मंदिराला भांग्या नाव पडले.
पुण्यातील अनेक भागात प्राचीन मंदिरे आहेत. पुण्याच्या रास्ता पेठेत पेशव्यांच्या फोजेला उंट बांधून ठेवण्याची जागा होती.यामुळे जवळच असलेल्या मारूती मंदिराला उंटाड्या मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
हे मंदिर लक्ष्मी रोडवर आहे. या मंदिराचा इतिहास साडेतीन शतकांपूर्वीचा आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात माराठ्यांची अहमदशहा अब्दालाहशी युद्ध झाले. या युद्धात ही हनुमानाची मूर्ती हलायला लागली होती. यामुळे या मंदिराला डुल्या मारूती असं नाव पडलं.
पुण्यातील तुळशीबागेजवळ असलेल्या हनुमान मंदिराला जिलब्या मारूती म्हणून ओळखले जाते. जून्या काळी या परिसरात जिलेबी बनवणारे लोक राहत असे. यामुळे या मंदिराला असे नावं पडलं.
या मंदिरात १८६७ पासून टिनपत्रे आहेत. असे मानले जाते की ससून हॉस्पिटलच्या बांधकामाच्या दरम्यान टिनपत्रे मागवण्यात आली होती. तेव्हा काही पत्रे मंदिरात ठेवण्यात आले होते. तेव्हापासून या मंदिराला पत्र्या मंदिर बोलले जाते.