आमिर खानचे 'हे' गाजलेले चित्रपट तुम्ही पाहिले का?

Monika Lonkar –Kumbhar

आमिर खान

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमिर खानचा आज ५९ वा वाढदिवस आहे.

Aamir Khan

आमिरने आतापर्यंत अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. या चिपटांमधून त्याने चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे.

Aamir Khan

आमिरच्या चित्रपटांची निवड आणि विषय हे वेगळे असल्यामुळे ते चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्याचे ५ चित्रपट OTT वर पाहू शकता. कोणते आहेत ते चित्रपट चला तर मग जाणून घेऊयात.

Aamir Khan

रंग दे बसंती

आमिरच्या करिअरमधील सर्वात सुपरहीट ठरलेला चित्रपट म्हणजे 'रंग दे बसंती' हा सिनेमा होय. २००६ मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Aamir Khan

लगान

२००१ मध्ये रिलाज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Aamir Khan

३ इडियट्स

इंजिनिअरिंग करणाऱ्या ३ मित्रांची गोष्ट या सिनेमातून पहायला मिळाली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. हा सिनेमा तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राईमवर पाहू शकता.

Aamir Khan

पीके

आमिरचा हा सुपरहीट चित्रपट तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर अवश्य पाहा. कॉमेडी बेस्ड असलेला हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Aamir Khan

दंगल

२०१६ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने तब्बल २००० कोटींची कमाई केली होती. हा सिनेमा तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राईमवर आणि Apple TV+ वर पाहू शकता.

Aamir Khan

महाराष्ट्राची मुलगी आणि पैठणीचं प्रेम, शिल्पा शेट्टीचा मराठमोळा अंदाज एकदा बघाच..!

shilpa shetty