हॅप्पी बर्थडे टेस्ट क्रिकेट; आजच्या दिवशी झाला होता जगातला पहिला कसोटी सामना

Shubham Banubakode

कसोटी क्रिकेटचा वाढदिवस

१५ मार्च हा कसोटी क्रिकेटसाठी खास दिवस आहे. याच दिवशी जगातला पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. आज कसोटी क्रिकेटला १४९ वर्षे पूर्ण झाली.

First Test Match Played On 15 March 1877

|

esakal

पहिला सामना कुठे झाला?

पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. हा ऐतिहासिक सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे झाला.

First Test Match Played On 15 March 1877

|

esakal

ऐतिहासिक दिवस

१५ मार्च १८७७ रोजी हा सामना खेळला गेला आणि त्यातूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात झाली. पुढे भारत, वेस्ट इंडिज, न्यूझीलंडसारख्या अनेक देशांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला.

First Test Match Played On 15 March 1877

|

esakal

तेव्हा कसोटी दर्जा नव्हता

हा सामना खेळला गेला तेव्हा त्याला कसोटी क्रिकेटचा दर्जा नव्हता. नंतर काही दिवसांनी त्याला अधिकृतपणे पहिला कसोटी सामना म्हणून मान्यता देण्यात आली.

First Test Match Played On 15 March 1877

|

esakal

पहिला रन कोणी केला?

कसोटी क्रिकेटमधील पहिला रन ऑस्ट्रेलियाचे कर्णधार चार्ल्स बॅनरमन यांनी केला. त्यांनी दुसऱ्याच चेंडूवर रन काढून इतिहास रचला.

First Test Match Played On 15 March 1877

|

esakal

पहिलं शतकही बॅनरमनचं

चार्ल्स बॅनरमन यांनी त्या सामन्यात १६५ धावांची शानदार खेळी केली. कसोटी इतिहासातील पहिलं अर्धशतक आणि पहिलं शतक देखील त्यांच्या नावावर आहे.

First Test Match Played On 15 March 1877

|

esakal

पहिला विकेट कोणाला?

कसोटी क्रिकेटमधील पहिला विकेट इंग्लंडच्या ऐलन हिल यांनी घेतला. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या नॅट थॉमसनला बोल्ड केलं.

First Test Match Played On 15 March 1877

|

esakal

ऐतिहासिक विजयाने सुरुवात

या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ४६ धावांनी विजय मिळवला. अशा प्रकारे कसोटी क्रिकेटच्या इतिहासाची सुरुवात झाली.

First Test Match Played On 15 March 1877

|

esakal

लोखंडाचं सोनं करणारा 'पारस दगड' आजही अस्तित्वात? ११०० वर्ष जुन्या किल्ल्यातील रहस्य...

Happy Birthday Test Cricket

|

esakal

हेही वाचा -