पुजा बोनकिले
भारतीय राजकारणात सहभागी होऊन अनेक महिलांनी त्यांच्या नेतृत्व क्षमता, धैर्य,उत्तम कार्य करून समाज कल्याण केले.
आज जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे.
या दिनानिमित्त स्वतंत्र्य भारतात पॉवरफुल महिला कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.
इंदिरा गांधी यांनी भारतीय राजकारणातील सर्वात सशक्त महिला म्हणून ओळखले जाते. या भारताच्या पहिल्या पंतप्रधान होत्या. आत्ता पर्यंत कोणीही महिला पंतप्रधान झालेली नाही.
सरोजनी नायडू या स्वतंत्र्य भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी योगदान दिले.
सुषमा स्वराज या एक प्रतिष्ठित आणि अतिशय शक्तिशाली महिला मानल्या जातात. या महिला परराष्ट्र मंत्री देखील होत्या .
मोदी सरकारमध्ये सर्वात पहिल्या सरंक्षण मंत्री आणि नंतर अर्थमंत्री बनून निर्मला सीतारमन यांनी आपली क्षमता आणि कार्यशैली दाखवून दिली.
सोनिया गांधी या एक सशक्त राजकीय महिला आहेत. राजीव गांधीच्या हत्येनंतर त्यांनी काँग्रेस पक्षाची संपूर्ण कमान हाती घेतली. तसेच सर्वात जास्त काळ सेवा देणाऱ्या महिला अध्यक्ष देखील राहिल्या.
प्रतिभाताई पाटील या भारताच्या महिल्या महिला राष्ट्रपती होत्या.