हडप्पा संस्कृतीतील लोकांचा आहार कसा होता?

Shubham Banubakode

वैविध्यपूर्ण आहार

हजारो वर्षांपूर्वीच्या हडप्पा संस्कृतीतील लोकांचा आहार अतिशय वैविध्यपूर्ण होता. ते फक्त धान्यच नव्हे, तर मांस, मासे, फळे आणि भाज्यांचाही आस्वाद घेत होते.

Harappan Civilization Food

|

esakal

मांसाहार

संशोधनानुसार हडप्पा संस्कृतीतील लोक शेळी, मेंढी आणि इतर प्राण्यांचे मांस खात होते. नद्यांच्या परिसरात राहणारे लोक मासेही खात असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

Harappan Civilization Food

|

esakal

संतुलित आहार

गहू, बार्ली, बाजरी आणि विविध डाळी त्यांच्या रोजच्या जेवणाचा भाग होत्या. त्यामुळे त्यांचा आहार संतुलित असल्याचे मानले जाते.

Harappan Civilization Food

|

esakal

फळं

दगडी उखळ, भांडी आणि मानवी दातांवर सापडलेल्या स्टार्चच्या कणांवरून ते आंबा, केळी आणि लसूण यांसारख्या पदार्थांचे सेवन करत असल्याचे स्पष्ट आहे.

Harappan Civilization Food

|

esakal

मसाल्याचा वापर

फक्त साधं जेवण नाही, तर चव वाढवण्यासाठी मसाल्यांचाही वापर केला जात होता. त्यामुळे त्यांची खाद्यसंस्कृती त्या काळातही प्रगत होती.

Harappan Civilization Food

|

esakal

विकसित शेती

सुरकोटडा येथे सापडलेल्या भाजलेल्या बियांचे अवशेष आढळले. यावरून त्या काळातील शेती आणि अन्नसाठवण किती विकसित होती, याची कल्पना येते.

Harappan Civilization Food

|

esakal

आहाराचे बारकावे

भारतात थेट जतन झालेले अन्न सापडले नसले, तरी आधुनिक वैज्ञानिक तंत्रांच्या मदतीने हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या आहाराचे अनेक बारकावे समोर आले आहेत.

Harappan Civilization Food

|

esakal

पोषक आहार

हडप्पा संस्कृतीतील लोकांचा आहार पोषक, संतुलित आणि विविधतेने भरलेला होता. संशोधनामुळे आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल नवनवे पैलू उलगडत आहेत.

Harappan Civilization Food

|

esakal

सिंधू संस्कृतीतील लोक कसे राहत होते?

How People Lived in the Indus Valley Civilization

|

esakal

हेही वाचा