भारताकडून खेळल्यानंतरही हरभजन सिंग झाला असता ट्रक ड्रायव्हर, पण...

Pranali Kodre

हरभजन सिंग

भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्तम फिरकीपटूंची जेव्हाही चर्चा होईल, त्यावेळी हरभजन सिंगचे नाव त्यात हमखास घेतले जाईल.

Harbhajan Singh | Sakal

१८ वर्षे भारतासाठी क्रिकेट

हरभजन सिंगने १९९८ ते २०१६ दरम्यान १८ वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळताना अनेक विजयात मोलाचा वाटा उचलला.

Harbhajan Singh | Sakal

२००१ कोलकाता कसोटी

२००१ मध्ये कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाला फॉलोऑननंतरही पराभूत करण्यात राहुल द्रविड - व्हीव्हीएस लक्ष्मणशिवाय हरभजननेही १३ विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला होता. त्याने हॅट्रिकही घेतली होती.

Harbhajan Singh | Sakal

सर्वाधिक विकेट्स

हरभजनने त्याच्या कारकि‍र्दीत ३६७ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ४४४ डावात ७११ विकेट्स घेतल्या आहेत. तो सर्वाधिक विकेट्स घेणारा अनिल कुंबळे (९५६) आणि आर अश्विननंतरचा (७६५) तिसरा गोलंदाज आहे.

Harbhajan Singh | Sakal

ट्रक ड्रायव्हर होण्याचा विचार

पण अनेकांना हे माहित नाही की हरभजनवर अशी परिस्थिती एकावेळी उद्भवली होती की तो ट्रक ड्रायव्हर होणार होता.

Harbhajan Singh | Sakal

१८ व्या वर्षी पदार्पण, पण...

झाले असे की १९९८ मध्ये १८ व्या वर्षीच हरभजनचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. पण १९९९ मध्ये त्याला भारतीय संघातून डच्चू मिळाला. त्यानंतर तो जवळपास दीडवर्ष भारतीय संघातून बाहेर होता.

Harbhajan Singh | Sakal

म्हणून ट्रक ड्रायव्ह होणार होता

यादरम्यानच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरातील एकटा मुलगा असलेल्या हरभजन सिंगवर कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यामुळे त्याने कॅनडाला जाऊन ट्रक ड्रायव्हर होण्याचा विचार केला होता.

Harbhajan Singh | Sakal

बहिणीचा पाठिंबा

मात्र, हरभजनच्या मोठ्या बहिणीने त्याला असं करण्यापासून रोखलं आणि क्रिकेटसाठी पाठिंबा दिला.

Harbhajan Singh | Sakal

कुंबळेला दुखापत अन् हरभजनला संधी

काही दिवसातच २००१ ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेवेळी अनिल कुंबळे दुखापतग्रस्त झाला आणि हरभजन सिंगला संधी मिळाली. हरभजननेही या संधीला दोन्ही हातांनी झेलले आणि ३ सामन्यात तब्बल ३२ विकेट्स घेतल्या.

Harbhajan Singh | Sakal

हरभजन सिंगच्या विकेट्स

यानंतर मात्र हरभजनने मागे वळून पाहिले नाही. त्याने १०३ कसोटीत ४१७ विकेट्स, २३६ वनडेत २६९ विकेट्स आणि २८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये २५ विकेट्स घेतल्या. त्याने आयपीएलमध्ये १६३ सामन्यांत १५० विकेट्स घेतल्या.

Harbhajan Singh | Sakal

कसोटीत सर्वात जास्त टॉस हरणाऱ्यांमध्ये भारत तिसरा; पहिल्या दोन क्रमांकांवर कोण?

Team India | Sakal
येथे क्लिक करा