Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा सामना बर्मिंगहॅमला २ जुलैपासून खेळवला जात आहे.
दुसर्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताने या मालिकेत सलग दुसऱ्यांदा नाणेफेक गमावली आहे. भारताने कसोटीत ५९१ सामन्यांपैकी ३०० व्या सामन्यात नाणेफेक गमावली आहे.
त्यामुळे कसोटीत ३०० वेळा किंवा त्यापेक्षा अधिक नाणेफेक हरणारा भारत तिसरा संघ ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक हरण्याच्या बाबतीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत टॉप-३मध्ये आहेत.
१. इंग्लंड – ५६३ टॉस हरले (१,०८६ सामने)
२. ऑस्ट्रेलिया – ४३४ टॉस हरले (८७५ सामने)
३. भारत – ३०० टॉस हरले (५९१ सामने)
४. वेस्ट इंडिज – २८३ टॉस हरले (५८५ सामने)
५. पाकिस्तान – २४७ टॉस हरले (४६५ सामने)
६. दक्षिण आफ्रिका – २४५ टॉस हरले (४७४ सामने)
७. न्यूझीलंड – २४३ टॉस हरले (४७८ सामने)