Mayur Ratnaparkhe
पंजाबमधील रोपड रेंजचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना अटक झाली आहे.
सीबीआयने ५ लाख रुपयांची लाच घेताना हरचरण सिंग भुल्लर यांना रंगेहाथ पकडलं आहे.
भुल्लर यांनी पंजाब पोलिस सेवेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
यानंतर भुल्लर यांना एसपीएसमधून आयपीएस केडरमध्ये बढती देण्यात आली.
हरचरण सिंग भुल्लर यांचे वडील मेजर मेहल सिंग भुल्लर हे पंजाब पोलिस दलात डीजीपी होते.
गुन्हेगारी नियंत्रणात उत्कृष्ट कामगिरी -
मोहालीच्या एसएसपी असताना भुल्लर यांनी गुन्हेगारी नियंत्रणात उत्कृष्ट कामगिरी दाखवली होती.
२०२३ मध्ये त्यांना डीआयजी पदावर बढती देण्यात आली होती.
हरचरण सिंग भुल्लर यांचे धाकटे बंधू कुलदीप सिंग भुल्लर हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत.