शौच कडक, पोट फुगतेय? थंडीमध्ये पचन सुधारण्यासाठी डॉक्टरांचा सुपर प्लॅन!

Aarti Badade

हिवाळ्यात पचनाचा ताण

थंडीत (Winter) कमी पाणी पिणे आणि तेलकट पदार्थ खाणे यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो, परिणामी बद्धकोष्ठता आणि गॅस वाढतो.

Winter Digestion Tips

|

Sakal

कोमट पाण्याचा नियम

दिवसभर थंड पाणी पिणे टाळा! दिवसातून ७ ते ८ ग्लास कोमट पाणी प्या. सकाळी उपाशी पोटी कोमट पाणी प्यायल्यास आतड्यांची साफसफाई होते.

Winter Digestion Tips

|

Sakal

फायबरचे महत्त्व

पराठे आणि मैदायुक्त (Refined Flour) पदार्थ टाळा. गाजर, मुळा, बीट यांसारख्या मोसमी भाज्या, पालेभाज्या (Leafy Greens) आणि बाजरी, ओट्स (Oats) अथवा दलिया (Daliya) खा.

Winter Digestion Tips

|

Sakal

शांत झोप आणि ऊन

पचन (Digestion) सुधारण्यासाठी शांत झोप 7 ते 8 तास आवश्यक आहे. तसेच, सकाळच्या कोवळ्या उन्हात 10 ते 15 मिनिटे फिरल्यास पचनास मदत मिळते.

Winter Digestion Tips

|

Sakal

प्रोबायोटिक्सची शक्ती

आतड्यांमधील चांगल्या जिवाणूंसाठी (Good Bacteria) प्रोबायोटिक (Probiotics) पदार्थ खा. दही, ताक, ढोकळा आणि इडली यांचा आहारात समावेश करा.

Winter Digestion Tips

|

Sakal

वेळेवर खाणे महत्त्वाचे

जास्त वेळ उपाशी (Fasting) राहिल्यास पित्त (Acidity) वाढते. दर ३ ते ४ तासांनी संतुलित अन्न खा आणि रात्रीचे जेवण हलके (Light Dinner) ठेवा.

Winter Digestion Tips

|

Sakal

जेवणानंतर दक्षता

रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नका. जेवण झाल्यावर किमान दोन तास (Two Hours) झोपणे टाळा, यामुळे छातीत जळजळ (Heartburn) होण्याची समस्या कमी होते.

Winter Digestion Tips

|

Sakal

फक्त एक भाजी खा... किडनी–लिव्हर दोन्ही राहतील फिट!

Chakvat Benefits for kidney and liver

|

Sakal

येथे क्लिक करा