Aarti Badade
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हरिश्चंद्रगड सुमारे १५०० वर्षे जुना असल्याचे मानले जाते.
इतिहासकारांच्या मते, हरिश्चंद्रगडाची सुरुवात ६व्या शतकात कलचुरी राजवंशाच्या काळात झाली असावी.
मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये हरिश्चंद्रगडाचा उल्लेख आढळतो असे सांगितले जाते.
गडावरील प्रसिद्ध गुहा साधारण ११व्या शतकात कोरल्या गेल्याचे मानले जाते.
गडावरील हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे प्राचीन स्थापत्य आणि शिल्पकलेचे महत्त्वाचे उदाहरण मानले जाते.
केदारेश्वर गुहेतील भव्य शिवलिंग आणि दगडी रचना हरिश्चंद्रगडाच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतात.
हरिश्चंद्रगड काही काळ मुघलांच्या ताब्यात होता आणि १७४७ मध्ये मराठ्यांनी तो आपल्या नियंत्रणात घेतल्याचे ऐतिहासिक नोंदी सांगतात.
Pune Vishrambag Wada
Sakal