Aarti Badade
पेशव्यांच्या काळातील वैभवाची साक्ष देणारा विश्रामबाग वाडा आजही पुण्याच्या मध्यवर्ती भागात दिमाखात उभा आहे. या वाड्याला तब्बल २०० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे.
Pune Vishrambag Wada
Sakal
पेशवे बाजीराव दुसरे यांनी १७९९ मध्ये ही जागा खरेदी केली. वाड्याच्या बांधकामाला जानेवारी १८०० मध्ये सुरुवात झाली आणि १८०९ मध्ये बांधकाम पूर्ण झाले.
Pune Vishrambag Wada
Sakal
या जागेवर पूर्वी पेशवाईतील सरदार हरिपंत फडके यांची बाग होती. या बागेचे नाव माळी विश्राम यांच्या नावावरून पडले आणि पुढे याच नावाने वाड्याची ओळख निर्माण झाली.
Pune Vishrambag Wada
Sakal
सुमारे २० हजार चौरस फूट परिसरात असलेला हा तीन मजली वाडा सुंदर लाकडी कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. सागवानी लाकडाचे स्तंभ, गॅलरी, व्हरांडा आणि नक्षीकाम येथे पाहायला मिळते.
Pune Vishrambag Wada
Sakal
वाड्याच्या पहिल्या मजल्यावर दरबार भरत असे. येथे मस्तानी महाल, नृत्य सभागृह आणि मेघडंबरी म्हणजेच नगारखाना अशी वैशिष्ट्ये होती. संगीतकार आणि गायकही येथे कला सादर करत असत.
Pune Vishrambag Wada
Sakal
१८१८ नंतर काही काळ वाडा बंद होता. १८२१ मध्ये येथे संस्कृत पाठशाळा सुरू करण्यात आली. १८७९ मध्ये लागलेल्या आगीत वाड्याचा काही भाग जळाला; त्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्याची डागडुजी करण्यात आली.
Pune Vishrambag Wada
Sakal
विश्रामबाग वाड्याला पुणे महानगरपालिकेने प्रथम श्रेणी वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. येथे संग्रहालय, ग्रंथालय, पोस्ट ऑफिस आणि स्थानिक हस्तकलेशी संबंधित उपक्रम पाहायला मिळतात.
Pune Vishrambag Wada
Sakal
Devgad Fort history:
Sakal