सकाळ डिजिटल टीम
काल महिला प्रिमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध झाला.
सामना दिल्ली कॅपिटल्सने २ विकेट्सने जिंकला.
या सामन्यात मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने ४२ धावांची खेळी केली.
या खेळीसह हरमनप्रीतने ट्वेंटी-२० विक्रमाला गवसणी घातली.
८००० ट्वेंटी-२० धावा करणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली.
याआधी स्मृती मानधनाने ८००० ट्वेंटी-२० धावांचा टप्पा गाठला आहे.
मुंबईच्या नॅट स्क्रिव्हर-ब्रंटने कालच्या सामन्यात ८० धावांची नाबाद खेळी केली.
तिने काल डब्ल्यूपीएलमधील आपले चौथे अर्धशतक पूर्ण केले.