Mayur Ratnaparkhe
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे.
हरमनप्रीत कौरची २०२४-२५ मध्ये एकूण संपत्ती अंदाजे २५ कोटी रुपये आहे.
हरमनप्रीतला हे उत्पन्न क्रिकेट, जाहिराती, ब्रँड डील आणि लीग सामन्यांतून मिळते.
हरमनप्रीत ग्रेड ए खेळाडू आहे. या श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी ५० लाख रुपये निश्चित पगार मिळतो.
याव्यतिरिक्त, हरमनप्रीतला प्रति सामना भरीव रक्कम देखील मिळते.
या खेळाडूंना एका कसोटीसाठी १५ लाख रुपये, वनडेसाठी ६ लाख आणि टी-२० सामन्यासाठी ३ लाख रुपये मिळतात.
हरमनप्रीत कौर ही महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये मुंबई इंडियन्सची कर्णधार आहे. तिला दर हंगामात अंदाजे १.८० कोटी रुपये मिळतात.
हरमनप्रीतचे नाव आज अनेक प्रमुख ब्रँडशी जोडले गेले आहे. एका ब्रँड डीलमधून तिला अंदाजे १० ते १२ लाख रुपये मिळतात.
तर ब्रँड एंडोर्समेंटमधून तिचे एकूण वार्षिक उत्पन्न सुमारे ४०-५० लाख रुपये आहे.
हरमनप्रीत भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
Shadab Jakati
esakal