अ‍ॅल्युमिनिअमच्या भांड्यामुळे किडनीवर काय परिणाम होतो?

संतोष कानडे

अ‍ॅल्युमिनिअम

अ‍ॅल्युमिनिअमची भांडी शरीरासाठी घातक असतात, हे आपण ऐकलेलं आहे. मात्र त्याचा दुष्परिणाम नेमका काय होतो.. ते पाहूया

मेंदूच्या पेशी

शरीरामध्ये अ‍ॅल्युमिनिअमचे प्रमाण वाढल्यास मेंदूच्या पेशींना इजा पोहोचवू शकते. यामुळे स्मरणशक्ती जाऊ शकते, असं संशोधनातून पुढे आलेलं आहे

कॅल्शियम

शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फर शोषण्याच्या प्रक्रियेत अ‍ॅल्युमिनिअम अडथळा आणते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात

किडनी

महत्त्वाचं म्हणजे अ‍ॅल्युमिनिअम थेट किडनीवर परिणाम करतं. किडनचे विकार असलेल्या लोकांना तर याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

सायट्रिक पदार्थ

अ‍ॅल्युमिनिअमच्या भांड्यामध्ये कधीही सायट्रिक पदार्थ म्हणजे टोमॅटो, लिंबू, चिंच असं आंबट पदार्थ बनवू नये. कारण रासायनिक प्रक्रियेद्वारे हा धातू अन्नात विरघळतो.

हिमोग्लोबिन

शरीरात अ‍ॅल्युमिनिअमचे प्रमाण वाढले की ते रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) निर्माण होते

स्टेनलेस स्टील

अ‍ॅल्युमिनिअमच्या भांड्यांऐजी स्टेनलेस स्टील, लोखंडी किंवा मातीची भांडी वापरावीत.

अ‍ॅल्युमिनिअम फॉइल

एवढंच नाही तर गरम अन्न अ‍ॅल्युमिनिअम फॉइलमध्ये पॅक करु नये. कारण हा धातू अन्नात मिसळू शकतो. ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.

फ्रीमध्ये विमान प्रवास करण्याच्या टिप्स

<strong>येथे क्लिक करा</strong>