Anushka Tapshalkar
दरवर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस फक्त महिलांचा सन्मान न करता महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानता याचं महत्त्व अधोरेखित करण्याचा आहे.
International Women's Day 2026
sakal
मात्र जगातील अनेक समाजांमध्ये आजही महिलांच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही परंपरा अस्तित्वात आहेत. या प्रथांचा संबंध सौंदर्य, शुद्धता, विवाह आणि कुटुंबाच्या सन्मानाशी जोडला जातो.
Women's Body Controlling Traditions Across World
sakal
अनेक देशांमध्ये या प्रथांविरोधात कायदे, जागरूकता मोहिमा आणि सामाजिक चळवळी सुरू असल्या तरीही जगभरातील लाखो महिला आणि मुलींवर त्यांचा परिणाम आजही दिसून येतो.
Laws and Awareness Drives for Women's Rights
sakal
कॅमेरून आणि काही आफ्रिकन देशांत ब्रेस्ट आयर्निंग ही प्रथा आढळते. यात मुलींच्या वाढणाऱ्या स्तनांवर गरम वस्तूंनी दाब दिला जातो, जेणेकरून लैंगिक लक्ष कमी मिळावे. यामध्ये अनेकदा कुटुंबातील सदस्यच सहभागी असतात. संशोधनानुसार सुमारे 58 टक्के प्रकरणांमध्ये आईच ही प्रक्रिया करते.
Breast Ironing
sakal
म्यानमार आणि उत्तर थायलंडमधील कयान समुदायात मुलींना लहान वयापासून मुलींच्या मानेभोवती पितळेच्या वेटोळ्या घातल्या जातात. कालांतराने त्या वाढवल्या जातात, ज्यामुळे मान लांब दिसते.
Neck Elongation
sakal
फीमेल जेनिटल म्युटिलेशन (FGM) ही प्रथा आफ्रिका, मध्यपूर्व आणि काही आशियाई भागांत आढळते, ज्यात वैद्यकीय कारणांशिवाय स्त्री जननेंद्रियांमध्ये बदल केले जातात किंवा काही भाग काढूनही टाकले जातात.
Female Genital Mutilation
sakal
काही आफ्रिकन समाजांत पतीच्या मृत्यूनंतर विधवांना कठोर धार्मिक किंवा सामाजिक विधी पाळावे लागतात.
African Traditions for Widows
sakal
मॉरिटानियामध्ये लेब्लूह नावाच्या प्रथेत मुलींना जबरदस्तीने जास्त खायला घालून शरीर जाड करण्याचा प्रयत्न केला जातो. ही प्रथा सौंदर्य आणि लवकर लग्नाशी जोडली जाते. त्यामुळे मुलींच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Forced Fattening
sakal