कबुतरांना दाणे टाकणे बंद करा! हर्षा भोगले असं का म्हणाले?

अनिरुद्ध संकपाळ

हर्षा भोगले हे भारताचे एक अभ्यासू आणि भाषेवर प्रभुत्व असलेले क्रिकेट एक्सपर्ट आहेत. हर्षा भोगले यांच्या समालोचनाचे जगभरात चाहते आहेत.

भोगले हे समालोचनाबरोबरच आपल्या स्पष्टवक्तेपणाबद्दल देखील प्रसिद्ध आहेत. भोगलेंच्या अनेक ट्विट्सची चर्चा होत असते

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. मात्र हर्षा भोगलेंनी एक वेगळंच ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधले.

हर्षा भोगलेंनी कबुतरांबद्दल ट्विट केलं आहे. त्यांनी झुकेर डॉक्टर नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून केलेली पोस्ट शेअर केली.

ही पोस्ट शेअर करताना भोगले म्हणाले की, खरंच, कृपा करून कबुतरांना दाणे टाकणे बंद करा ते तुमच्याच आरोग्याला धोका निर्माण करतात.

झुकेर डॉक्टर या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये कबुतरांमुळे माणसांना श्वसनाचा आजार होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.

WPL 2024 च्या उद्घाटन समारंभात टायगर श्रॉफने जिंकले सर्वांचे मन