WPL 2024 च्या उद्घाटन समारंभात टायगर श्रॉफने जिंकले सर्वांचे मन

अनिरुद्ध संकपाळ

बॉलीवूडचा तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो इंडस्ट्रीतील सर्वात सुप्रसिद्ध कलाकारांपैकी एक का आहे !

नुकत्याच झालेल्या वुमेन्स प्रीमियर लीग 2024 च्या उद्घाटन समारंभात टायगर ने त्याच्या दमदार परफॉर्मन्स ने प्रेक्षकांना मोहित केलं आहे.

टायगर हा त्याच्या अभिनयाच्या सोबतीने उत्तम डान्सर म्हणून ओळखला जातो यात शंका नाही २०२४ मधल्या या खास इव्हेंट मध्ये त्याने धमाकेदार परफॉर्मन्स ने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.

डोळ्याचं पारणं फेडणारा हा कार्यक्रम आणि टायगर चा खिळवून ठेवणारा परफॉर्मन्स या कार्यक्रमाला चार चाँद लावून गेला आहे आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांनी अनुभवला आहे.

ट्रेडमार्क आणि अफलातून स्टंट्सने टायगरने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो मनोरंजनाच्या जगात एक बेस्ट अभिनेता आहे.

या खास इव्हेंटच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्याचा अनुभव सांगताना टायगरने WPL 2024 चे आयोजक आणि प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

टायगर त्याच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत असून ज्यामध्ये तो आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी ईदला रिलीज होणार आहे. सोबतीला टायगर लवकरच 'सिंघम अगेन' मध्येही ॲक्शन अवतारात दिसणार आहे.

एका संघाविरूद्ध 100 विकेट्स अन् 1000 धावा! यादीत एकमेव भारतीय