Anuradha Vipat
अभिनेता हर्षवर्धन राणे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी 16 वर्षी घर सोडून मुंबईत आला होता
त्यानंतर 2008 मध्ये त्याने ‘लेफ्ट राइट लेफ्ट’ मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये छोटी भूमिका साकारली होती
2010 मध्ये त्याने तेलुगू सिनेमात प्रवेश केला.
त्यानंतर 2016 मध्ये आलेल्या त्याच्या ‘सनम तेरी कसम’ या हिंदी सिनेमामुळे त्याचं नशीबच पालटलं.
हर्षवर्धन वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला होता.
‘मोहोब्बते’ फेम अभिनेत्री किम शर्मासोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा होत्या.
त्यानंतर अभिनेत्री संजीदा शेखसोबत हर्षवर्धनचं नाव जोडलं गेलं. तेव्हा संजीदा विवाहित होती.