अर्थसंकल्पात तरतूद केलेलं हस्तिनापूर आज कसं आहे?

संतोष कानडे

हस्तिनापूर

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये हस्तिनापूरच्या विकासासाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे महाभारतकालीन वैभवाचा पुनर्जन्म होईल.

ऐतिहासिक वारसा

हस्तिनापूर हे महाभारतातील कुरु वंशाची आणि पांडवांची राजधानी म्हणून ओळखले जाते. भारतीय संस्कृतीची मुळे येथे खोलवर रुजलेली आहेत.

पर्यटन

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हस्तिनापूरला 'प्रमुख सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळ' म्हणून विकसित करण्याची घोषणा केलीय.

उत्खनन

पुरातत्व उत्खनन स्थळांचे जतन करून ते पर्यटकांसाठी खुले केले जातील, त्यामुळे जगाला भारतीय संस्कृती अनुभवता येईल.

जैन धर्म

हस्तिनापूर केवळ हिंदू धर्मासाठीच नाही, तर जैन धर्माच्या तीन तीर्थंकरांचे जन्मस्थान म्हणूनही अत्यंत पवित्र मानले जाते.

आकर्षण

येथे पांडेश्वर महादेव मंदिर, द्रौपदी घाट, विदूर टीला आणि अष्टापद जैन मंदिर यांसारखी ऐतिहासिक स्थळं आहेत.

पर्यटन

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील पर्यटनाला गती मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील.

संस्कृती

महाभारतकालीन शौर्य आणि संस्कृतीचा वारसा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी येथे विशेष हेरिटेज वॉक आणि म्युझियम उभारण्यात येईल.

देशाला मिळालेल्या आठ महिला उपमुख्यमंत्री कोण?

<strong>येथे क्लिक करा</strong>