संतोष कानडे
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे
सुनेत्रा पवार यांच्यापूर्वी देशात सात महिला उपमुख्यमंत्री झाल्या. त्यांची यादी पाहूया.
राजेंद्र कौर ह्या पंजाबच्या उपमुख्यमंत्री होत्या. १९९६ ते २००७ दरम्यान त्या ३ वर्षे या पदावर होत्या.
जमुना देवी यांनी मध्य प्रदेशात १९९८ ते २००३ या काळात पाच वर्षे उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं
कमला बेनिवाल यांनी राजस्थानमध्ये २००३ वर्षात केवळ ३१७ दिवस उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली
पामुला पुष्पा श्रीवानी यांनी आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्री म्हणून २०१९ ते २०२२ या काळात साधारण तीन वर्षे काम बघितले
रेणू देवी यांनी २०२० ते २०२२ या काळात बिहारचं एक वर्ष २६६ दिवस उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं
राजस्थानमध्येच दिव्या कुमारी ह्या १५ डिसेंबर २०२३ पासून अद्यापपर्यंत उपमुख्यमंत्री आहेत
प्रवती परिदा ह्या ओडिसा राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी १२ जून २०२४ रोजी पदभार स्वीकारलेला आहे.
आठवा नंबर हा सुनेत्रा पवार यांचा आहे. ३१ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे.