Aarti Badade
३ खजूर आणि १० बदाम रोज सकाळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जेचा जबरदस्त पुरवठा होतो. दिवसभर फ्रेश आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी उपयोगी.
सुका मेवा फायबरने भरलेला असतो. पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता दूर होते.
बदाम हे मेंदूच्या आरोग्यासाठी प्रसिद्ध आहेत. रोज सेवन केल्यास एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.
खजूर आणि बदाममध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. हाडांचे आरोग्य सुधारते आणि संधिवाताचा त्रास कमी होतो.
व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा मऊ, चमकदार आणि निरोगी राहते. सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे UV किरणांपासून संरक्षण करतात. उन्हामुळे होणारे नुकसान कमी होते.
फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. त्वचा आणि केसांना तरुण ठेवण्यात मदत होते.
कोणतेही कॉस्मेटिक न वापरता त्वचेला नैसर्गिक पोषण मिळते. दीर्घकाळ सौंदर्य टिकते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कुठलाही आहार बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.
खजूर आणि बदाम दोन्ही तणाव कमी करण्यात मदत करतात. झोप सुधारते, मानसिक शांतता मिळते.